Opening Time Open - Mon - Sat : 9.00 am to 7.00 pm, Sunday : 9.00 am to 1.30 pm
Call Now
+91 233 2301939
call-now
Email Us
info@anuradhaeye.com
mail-us

Netra Seva Foundation

आपणास सर्वाना कल्पना आहे कि, आमची नेत्रसेवा प्रतिष्टान सांगली, ही सेवाभावी संस्था ना नफा ना तोटा या तत्वावर सन २००३ पासून अविरत पणे सेवा देत आहे. समाजातील गरीब आणि गरजू नेत्र रुग्णांना संपूर्णपणे मोफत नेत्रसेवा पुरवण्याचे काम आमच्या नेत्रसेवा एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम राबविला आहे. नेत्र रुग्णांना जास्तीत जास्त सेवा देणे, त्यांची काळजी घेणे, तसेच त्यांना चांगली दृष्टी देण्याचे काम आमची टीम करते. नेत्रसेवा प्रतिष्टान द्वारे संचलित अनुराधा सुपरस्पेशालिटी आय हॉस्पिटल सांगली, येथे संचालक मंडळाने उपलब्ध करून दिलेला नेत्रसेवा प्रतिष्टान हा स्वतंत्र विभाग असून तिथे स्वतंत्र बाहयरुग्ण विभाग (OPD), स्वतंत्र आंतररुग्ण विभाग (IPD) व स्वतंत्र सुसज्ज ऑपरेशन थियेटर (OT) आहे. त्याचबरोबर तज्ञ डॉक्टर आणि ईतर सहयोगी स्टाफ हा सदैव रुग्णसेवेसाठी हजर असतात.

दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा नेत्रसेवा प्रतिष्टानला समाजातील दानशूर व्यक्तींनी जी देणगी दिली त्यामुळे आम्ही नेत्रासेवेची कामे उत्तमरीत्या पूर्ण करत आहोत. यामध्ये विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे Eftec India हि प्रत्येक दोन वर्षातून एखदा डोनेशन देते. २ वर्षापूर्वी पुणे येथे कार्यरत असणाऱ्या Eftec India Pvt. Ltd. या उद्योग समूहाने आपल्या संस्थेला रु. ५,७६,०४४/- इतक्या रक्कमेची देणगी स्वरुपात मदत केली आहे. या रक्कमेतून आम्ही ऑपरेशन साठी आवश्यक असणारी MMD A-Scan Machine d Omniglo मशीन उपकरणे घेतली. या उपकरणामुळे पेशंट न लागणाऱ्या लेन्सची पॉवर मोजण्यासाठी आणि ज्या मशीनवर डोळ्याचे ऑपरेशन होते त्या मशीनची स्पष्टता व पारदर्शकता पाहण्यासाठी केला जातो. त्यामुळे आमची संस्था Eftec India Pvt. ltd. उद्योगाचे प्रेसिडेंट श्री. महेंद्र किल्लेदार सर यांची आभारी आहे.

सातत्यपूर्ण गुणवत्तामध्ये सुधारणा करणे हे आमच्या नेत्रसेवा संस्थेचे मुख्य उद्दिष्ट असून त्याप्रमाणे आम्ही नेहेमी प्रयत्नशील असतो. त्यानुसार अनुराधा सुपरस्पेशालिटी आय हॉस्पिटल मध्ये काम करत असणाऱ्या स्टाफला नेत्रशिबिराचे आयोजन कसे करावे याचे महत्त्वपूर्ण ट्रेनिंग मिळाले आहे. त्यामुळे सेवेमध्ये सात्यतता दिसून येते. यामध्ये मह्र्त्वाचा भाग म्हणजे Community Partner या संकल्पनेच्या माध्यमातून नेत्रशिबिर घेण्याच्या कार्यात इतर सामाजिक संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. यासाठी अनुराधाच्या सर्व डॉक्टर/डायरेक्टर यांचे आभार मानणे आवश्यक आहे.

आतापर्यंत नेत्रसेवा प्रतिष्टान हे सांगली जिल्ह्यामध्ये काम करत होते परंतु सन २०२३ पासून कोल्हापूर जिल्हामध्ये पण काम करण्याची संधी मिळाली. त्यानुसार कोल्हापूर स्थित असलेल्या CPR (छत्रपती प्रमिलाराजे) या शासकीय हॉस्पिटल कडून सन २०२३-२४ मध्ये एकूण १५५ पेशंटची मोतीबिंदूची मोफत ऑपरेशन करण्यात आली.

नेत्रसेवा प्रतिष्टान बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करून माहिती डाऊनलोड करा.

Designed & Developed by INfinity Asia