नेत्रसेवा प्रतिष्ठानसंचलित,‘दृष्टिदान आय बँक’द्वारा– अनुराधा नेत्र रुग्णालय व पॉलिक्लीनिक, विश्रामबाग, सांगली
नेत्रसेवा प्रतिष्ठान संचलित, ‘दृष्टिदान आय बँक’ हि ०१ नोव्हेंबर २००५ ला स्थापना केली असून आज अखेर एकूण या आय बँकेला १०४९ डोळे दान म्हणून मिळाले आहेत त्यापैकी आज पर्यंतजवळपास 360 इतके डोळे गरजू लोकासाठी वापरले असून त्यांना दृष्टी मिळाली आहे.डॉ. प्रियांका भिडे या दृष्टिदान आय बँक च्या इन्चार्ज आहेत.नेत्रसेवा प्रतिष्ठान संचलित, ‘दृष्टिदान आय बँक’ चे काम हे समाधानकारक आहे.मागेचआयबँक सुधारणेसाठी रु. १५ लाखाचे सरकारी विशेष अनुदान मिळवून त्यातून स्पेक्युलर मायक्रोस्कोप या नावाने अत्यंत सुधारित व उपयुक्तमशीन खरेदी करण्यात आले आहे. काढून आणलेल्या बुबुळांची (डोळ्यासाठी) गुणवत्ता या मशीनद्वारेअचूक तपासली जाते व त्यांचे रोपणासाठी (डोळे बसवण्यासाठी) निवड केली जाते. असे मशीन पश्चिम महाराष्ट्रात‘दृष्टिदान आय बँकेने’ प्रयत्नपूर्वक पाठ पुरावा करून मिळवले आहे.स्पेक्युलर मायक्रोस्कोप ने उत्तमगुणवत्तेच्या बुबुळांची निवड करून बुबुळ रोपण करणे खूप सोयीचे झालेले आहे. समाजात नेत्रदानाविषयी जागृती होणे खूपच गरजेचे आहे. अंध लोकांच्या लिस्ट मध्ये तरुण लोकांचा समावेश जास्त आहे.त्यांच्या साठी तरुण डोळ्यांची आवश्यकता आहे. पण दुर्दैवाने तरुण लोकांचे मरणोत्तर नेत्रदान फार कमी प्रमाणात होते. त्यासाठी लोकांचे याबाबतचे प्रबोधन होणे गरजेचे आहे.सर्वांनी नेत्रदान चळवळीत नेत्रदान प्रबोधन करणे, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना नेत्रदानाचे महत्व पटविणे, नेत्रदानासाठी प्रवृत्त करणे हे कार्य करणे अपेक्षित आहे.त्याचप्रमाणे, नेत्रसेवा प्रतिष्ठान संस्थेद्वारा अनुराधा नेत्र रुग्णालय विश्रामबाग,सांगली येथे गेली १५ वर्षे गोरगरीब व गरजू जनतेसाठी नेत्र चिकित्सा, मोतीबिंदू तसेच डोळ्याच्या ईतर ऑपरेशन करिता शिबिरांचे आयोजन करीत आहे. सदर शिबिरात अत्यल्प दराने, ज्यांना वेळ काढून व पैसा भरून नेत्र तपासणी करणे शक्य नाही, तसेच जे अत्यंत गरीब परीस्थित आहेत अशा लोकांसाठी दृष्टिदान आय बँक एक सामाजिक बांधिलकी व सेवाभावीवृतीने जनसेवा म्हणून काम करीत आहे. या शिबिरात प्रतेक्षपणे अनुराधा आय हॉस्पिटलचे ईतर सहयोगीडॉक्टर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. तसेच फेलोशिप डॉक्टर, हॉस्पिटलचा स्टाफ, नेत्रसेवा प्रतिष्ठानच्या सहयोगी डॉक्टर्स मंडळींचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
डॉ.मिलिंद किल्लेदार यांनी आपल्या दैनंदिन कामकाजातून वेळकाढूनगोरगरिबासाठी परवडणारी व प्रसंगी मोफत अशी सेवा चालू ठेवली आहे. नेत्रदानामध्ये ज्या ज्या लोकांनी नेत्रदान केले आहे त्यांच्या आत्म्यासचिरशांती मिळावी अशी दृष्टिदान आय बँकेच्या वतीने प्रार्थना करण्यात येते. तसेच त्यांच्या नातेवाईकांनी सुद्धा त्यांच्या दुखद प्रसंगी आठवणीने व सामाजिक जबाबदारी ओळखून नेत्रदान केले ज्यामुळे मरणोत्तर आपल्या नातलगांची इच्छा पूर्ण करून अंध लोकांना आशेची किरणे दाखविल्याबद्दलदृष्टिदान आय बँक त्यांची सदैव ऋणी राहील.
आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो कि, आमच्या संस्थेस नुकतेच प्राप्तीकर खात्याकडून 80G नियमाखाली करसवलत मिळण्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले असून त्याचा नं.1961/139/(4C)(139(4A) दि. ०१.०४.२०११ पासून लागू झाला आहे. आम्ही आमच्या संस्थेकडून समाजातील दानशूर व्यक्तीव संस्थाना या समाजपयोगी कार्यासाठी भरीव मदत करण्याचे आवाहन करीत आहोत.त्याचप्रमाने आम्ही प्रत्येक वर्षी २६ जानेवारीला नेत्रदात्यांच्या नातेवाईकांचा सत्कार समारंभमेळावाआयोजित करीत आहे.
अनुराधा आय हॉस्पिटलची www.anuradhaeye.comअशी वेबसाईट असून त्यावरूनही आपणास अधिक माहिती मिळविता येईल.
नेत्रदानासाठी २४ तास संपर्क क्र. ९६२३२३१९१९