Testimonials

येथे ऑपरेशन करण्यामागे माझे मत म्हणजे माझा एक डोळा निकामी असल्याने दिसत नाही त्यामुळे दुसऱ्या डोळ्याचे ऑपरेशन काळजीपूर्वक व्हावे यासाठी मी या दवाखान्यात ऑपरेशन केले. कारण डॉ किल्लेदारांचे अनुराधा नेत्र रुग्णालय याच्या विषयी मी चांगली मते ऐकली होती. इथला स्टाफ व डॉक्टर्स को-ऑपरेटिव्ह आहेत. त्यांनी मला केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. माझे डोळ्यांचे ऑपरेशन अत्यंत यशस्वी झाले आहे. धन्यवाद.....

एस.आर.लोढे रा.पनवेल

अनुराधा नेत्र रुग्णालय हे सांगली नगरीतील उत्तम प्रतीचे रुग्णालय आहे. येथे श्री.कोटणीस, श्री.कोळेकर यांनी ऑपरेशन बाबत उत्तम आणि काळजीपूर्वक सेवा दिली जाते डॉक्टर स्वतः लक्ष देवून समाधानकारक ऑपरेशन करतात व येथील सुविधा चांगल्या आहेत असे सांगितले. येथील स्टाफ काळजीपूर्वक व नियोजनबद्ध व सेवाभावी काम करतो. सांगली शहरात या तोडीचे रुग्णालय नाही.

सौ. मेटकरी

आपल्या नेत्र रुगालयात माझे मोतीबिंदू व तिरळेपणा घालविण्याची शस्त्रक्रिया दि.१९/०२/२०१८ रोजी झाली. मी आपल्या दवाखान्यात येण्या आधी सांगली जिल्ह्यातील बर्याच डोळ्याच्या दवाखान्याची माहिती घेवून त्यांची सेवा, वेवस्था,वेवस्थापन व डॉक्टरांची पदवी व त्यांची रुग्णाबरोबर बोलणे, वागणे,समजावून सांगणे,सहकार्य,समाजाबद्दल आत्मीयता ई.चा विचार करता आपले रुग्णालय सांगली जिल्ह्यामध्ये सर्वश्रेष्ठ वाटते. आपली हीच सेवा अशीच अखंड चालू राहावी व समाजामधील सर्व स्थरातील लोकांना त्याचा लाभ मिळत राहावा हीच सदिच्छा...!

श्रीपाल कुबेर कांचनकोटी, रा. सावळज ता. तासगाव

दि.०७/०३/२०१८ रोजी माझ्या डोळ्याचे मोतीबिंदू व काचबिंदू ऑपरेशन आपल्या अनुराधा नेत्र रुग्णालयात झाले. ऑपरेशन अत्यंत चांगले झाले. आम्ही गेले २०-२५ पासून डॉ किल्लेदार यांचेकडे डोळे तपासणी साठी येतो. आमचे सर्व कुटुंबीय येथेच येतात. मा.डॉ.किल्लेदार हे फार चांगले डॉक्टर असून पेशंट तपासणी कडे स्वतः लक्ष देतात. या हॉस्पिटल मधील स्टाफ अत्यंत चांगला, सहकार्य करणारा व पेशंट बरोबर चांगल्या पद्धतीने व आपुलकीने वागणारा आहे. तसेच डॉ किल्लेदार हे स्वतः मन मिळाऊ, शांत असलेने पेशंटला धीर मिळतो. ते तज्ञ असलेने ऑपरेशन बाबत त्यांचे कडून चूक किंवा निष्काळजीपण कधीही होत नाही. त्यांचे बद्दल सांगली व जिल्ह्यात डोळ्याचे चांगले डॉक्टर म्हणून नावलौकिक आहे. तसेच त्यांचेकडे काम करणारे इतर डॉक्टर विशेषतः डॉ. सौ.संगीता मालानी या पण चांगल्या हुशार, मनमिळाऊ स्वभावाच्या डॉक्टर आहेत. महाराष्ट्रातील इतर ठिकाणी वास्तव्यास असणारे आमचे मित्र मंडळी व नातेवाईक यांना आपण डोळ्याबाबत मुंबई - पुणे येथे जाणे अगोदर डॉ.किल्लेदार यांचेकडे सल्ला घ्यावा व डोळ्याचे सर्व उपचार अनुराधा नेत्र हॉस्पिटल मधेच करावी अशी शिफारस नेहमी करतो. अनुराधा आय हॉस्पिटलच्या सर्व कर्मचारी व इतर डॉक्टर यांना सदर हॉस्पिटल यापुढेही नावलौकिकास नेणे करिता देवाने त्यांना शक्ती द्यावी. मा.डॉ. किल्लेदार व डॉ.सौ.मालानी यांना हार्दिक शुभेच्छा. आज पर्यंत आपल्याकडून डोळ्याबाबत जी चांगली उपचार पद्धत मिळाली त्याबाबत आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. धन्यवाद.....

सुनंदा सर्जेराव पाटील

माझे वय ५३ वर्षे असून या दवाखान्यात दि ०३/०५/२०१८ रोजी माझ्या उजव्या डोळ्यांचे ऑपरेशन मा.डॉ. किल्लेदार साहेब व त्यांच्या सहकार्यांनी अत्यंत कुशलतेने केले असून येथील हॉस्पिटल मधील कर्मचार्यांनी आम्हास जी आपुलकीने स्नेहपूर्वक सेवा दिली तसेच योग्य प्रकारे माहिती मार्गदर्शन केले त्याबद्दल मा.डॉ किल्लेदार साहेब व त्यांच्या सहकार्यांचे, कर्मचार्यांचे आम्ही शतशः ऋणी असून आम्हा पेशंट ना असाच स्नेह मिळावा. धन्यवाद !!!!!!

सौ. सुनिता रवींद्र कांबळे, विश्रामबाग, सांगली

माझा मुलगा ९ वर्षाचा असताना त्याला नेहमी रांजणवाडीचा त्रास व्हायचा. डोळ्यांना रांजणवाडी एका वर्षातून ६ ते ७ वेळा होत होती. त्यावेळी डॉ. शर्मिला देशपांडे मॅडम यांनी डॉ.किल्लेदार सर यांचेकडे दाखविण्याचे सुचाविले. येथे आम्ही दाखविल्यानंतर आम्हाला कळले की, पापण्यामध्ये असणारी घाण किंवा केसातील कोंडा यामधील अस्वच्छते मुळे असे वारंवार होते. त्यांतर तो त्रास सरांच्या मार्गदर्शनाने कायमचा कमी झाला व तेथूनच आम्ही आमच्या घरच्या प्रत्येक रुग्णास अनुराधा नेत्र रुग्णालयातच आणीत होतो. माझ्या सासर्यांचे दोन्ही डोळ्यांचे व माझ्या आईचे हि दोन्ही डोळ्यांचे मोतीबिंदू चे ऑपरेशन या दवाखान्यातच वेवस्थित झाले. तेंव्हा पासून प्रत्येक वेळी आम्ही येथेच येतो व इतरांना हि इथेच यायचा सल्ला देतो.

उषा पवार

या हॉस्पिटलमध्ये माझे मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले असून येथील अनुभव खूपच चांगला आहे. डॉ किल्लेदारांचा पेशंट बरोबरच सुसंवाद आत्मविश्वास वाढविणारा आहे. येथील स्टाफ सुद्धा खूप चांगला आहे. ऑपरेशन दिवशीचे जेवण, येथील स्वच्छता, वक्तशीरपणा सर्वच वाखाळण्याजोगा आहे....

सौ. संध्या वसंत कुलकर्णी

Very fantastic and good results, good vision after Phacoemulsification and IOL implant of both mine as well as my wife's operations in both eyes...

Dr. B P Patil - MBBS

माझ्या आई व वडिलांचे दोघांचे डोळ्यांचे ऑपरेशन मोतीबिंदुसाठी इथेच झाले. आम्ही उगार खुर्द येथे डॉ राजू कुलकर्णी यांच्या कडे सर्वप्रथम डोळे दाखविले व त्यांनीच इकडे येण्याचा सल्ला दिला. येथील सर्व सिस्टीम खूपच समाधानकारक आहे. सर्व स्टाफ अगदी वेवस्थित काळजी घेणारा आहे. आम्हास जे लोक, मित्र, पाहुणेमंडळी डोळ्याच्या ऑपरेशन बद्दल सल्ला विचारात त्यांना आम्ही निषींतपाने इकडे येण्याचा सल्ला देतो. आम्हा सर्व कुटुंबीयाकडून आपणा सर्वाना खूप खूप मनापासून शुभेच्छा....

विलास डी. संकपाळ

आपल्या हॉस्पिटल मधील सेवा खूपच छान आहे. अशी सेवा कायम राहूदे हि सदिच्छा. हॉस्पिटलमधील स्वच्छता उत्तम आहे.

सुरगोंडा पी. पाटील

मोतीबिंदूचे ऑपरेशन होणे आधी माझ्या डोळ्याना पुसट दिसत होते. रात्री गाडी चालविताना पुढून येणाऱ्या गाडीचा लाईट डोळ्यावर पडला की पुढचे काही दिसत नव्हते. परंतु आता ऑपरेशन नंतर पुसट दिसत होते ते आता स्पष्ट दिसते. पेपर वगैरे वाचता येतो.

राजेंद्रकुमार गणपतराव वायचळ

माझ्या आईच्या डोळ्यांचे ऑपरेशन इथे चांगले झाले आहे. मला खूप आनंद झाला तुमच्या हॉस्पिटलला आणि स्टाफ ला माझ्या लाख लाख शुभेच्छा..........

श्रीकांत आण्णा लंबे

डॉ. मिलिंद किल्लेदार नेत्रतज्ज्ञ हे अत्यंत चांगले आहेत. मी दोन ठिकाणी दाखविले तेथे फी भरपूर सांगितली होती पण डॉ किल्लेदार यांच्या दवाखान्यात माफक फी घेवून माझ्या डोळ्यांचे ऑपरेशन वेवस्थित केले आहे. मला पूर्णपणे वेवस्थित दिसते. डॉक्टर हे पेशंटशी अत्यंत चांगल्या प्रकारे वागणूक देतात व इथला स्टाफ सुद्धा चांगला आहे. मला ईतर हॉस्पिटल पेक्षा इथे चांगला अनुभव आला आहे. डॉक्टर हे गरीब पेशंट ना समजावून घेतात व वेवस्थित समजावून सांगतात व उपचार वेवस्थित करतात.

ज्ञानदेव भीमराव पाटील

पूर्व ईतिहास असा आहे की या हॉस्पिटलचे मा.डॉ किल्लेदार सर हे डॉक्टर लिमये यांच्या हॉस्पिटल मध्ये जेव्हा पेशंट लोकांची डोळ्यांची सर्जरी करीत होते तेव्हा पासून माझ्या घरातील बहुतेक सर्वजण माझे आजोबा, आजी, वडील, आई, मावशी, मामा व इतर सर्वांची डोळ्याची सर्जरी सरांनीच केली होती व त्यामधील आता काहीजण हयात आहेत व काहीजण स्वर्गवासी झाले आहेत. सरांच्या हाताला जे काही यश परमेश्वराने देवू केले आहे ते बहुतेक इतरत्र पहावयास मिळणे कठीणच आहे म्हणून मी सरांचे आभार मानतो. माझे ऑपरेशन पूर्वी मला योग्य ते मार्गदर्शन येथेच मिळाले. सर्व स्टाफ व ईतर डॉक्टर्स व नर्सेस यांचे मौलाचे सहकार्य मिळाले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानतो. ऑपरेशन नंतर पूर्वीप्रमाणे दृष्टी मिळाली म्हणून आनंद वाटला. सर्वांचा मी आभारी आहे.

सॅम्युएल एस. दयादान

मला या दवाखान्यात माझ्या बाबतीत सर्व सेवा चांगल्या मिळाल्या या बाबतीत मी पूर्णपणे समाधानी आहे. ऑपरेशन पूर्वी व नंतर सर्व माहिती मला स्टाफ कडून वेवस्थित मिळाली. तपासणी व ऑपरेशन तज्ञाच्या कडून चांगले झाले त्याबद्दल त्यांचा मी ऋणी आहे. धन्यवाद..

द्वारपाल पा.वाणी

ऑपरेशन पूर्वी समोरील वस्तू स्वच्छ दिसत नव्हती ऑपरेशन नंतर आता वेवस्थित दिसायला लागले. ऑपरेशन अत्यंत कमी वेळेत झाले. ऑपरेशन पूर्वी डॉक्टर साहेबांनी माझ्या सगळ्या शंकांचे निरसन अगदी थोड्या वेळात केले त्यामुळे मला ऑपरेशन चे टेन्शन वाटले नाही. डॉ किल्लेदार यांचा स्वभाव शांत आहे. येथील सगळा स्टाफ कोऑपरेटिव्ह आहे. सगळ्या प्रश्नाची उत्तरे समाधानकारक व शांतपणे दिली जातात. दवाखान्यातील स्वच्छतेमुळे दिवसभर येथील वातावरण प्रसन्न असते. धन्यवाद....!

सुरेश मलगोंडा पाटील

ऑपरेशन चांगले झाले नंतरची post opreative care खूप चांगली आहे. एकूणच त्रास काही झाला नाही. Advanced Tech. चा फायदा झाला. सिस्टीम हि उत्तम आहे धन्यवाद........

सौ. दीपा जोशी

माझी आई हिच्या डोळ्याच्या ऑपरेशन साठी इथे येण्याची हि दुसरी वेळ. पहिले ऑपरेशन चांगले झालेमुळे दुसऱ्या ऑपरेशन साठी याच हॉस्पिटल मध्ये येण्याचा निर्णय घेतला ऑपरेशन योग्य पद्धतीने व चांगले झाले आहे. या वयात सुद्धा आईना चांगले दिसायला लागल्यामुळे निदान तिचे उर्वरित आयुष्य कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही.... धन्यवाद......

उदय जोशी

माझ्या आईचे मोतीबिंदूचे ऑपरेशन इथे केले डॉ मिलिंद किल्लेदार खूपच चांगले आहेत असे ऐकून होतो त्यामुळे माझ्या आईला घेवून मी येथे आले खूपच छान चांगल्या पद्धतीने ऑपरेशन केले आहे. आता आईला चांगले दिसते आमचे सर्व नातेवाईक यांचे ऑपरेशन इथेच झाले. डॉ किल्लेदार यांचे आभार...................

कविता बाबुराव बिरनाळे

माझे मूळ गाव जयसिंगपूर पण आम्ही मुंबईहून आलो. माझे एका डोळ्यांचे ऑपरेशन पुण्यामध्ये झाले पण येथे आल्यानंतर माझा भाचा डॉ. पद्मनाभ जोशी यांच्या कडून डॉ किल्लेदार खूप चांगले डोळ्यांचे डॉक्टर आहे म्हणून कळले व येथे दाखवण्यास आलो. पुण्याच्या मानाने मला या हॉस्पिटल मध्ये खूपच चांगली वेवस्था व उपचार मिळाले. वेवस्थित माहिती सांगून तुम्हाला काय योग्य आहे ते सांगितले गेले. एकूण हॉस्पिटल मधील वेवस्था व सर्व स्टाफ खूपच चांगला व कोऑपरेटिव्ह आहे. मला खूपच चांगला अनुभव आला. मी तरी सर्वांना सांगताना हे हॉस्पिटल खूपच चांगले आहे असे सांगते. मी डॉक्टरांची आभारी आहे.

सौ. गौरी प्रकाश कुलकर्णी

This letter of appreciation for the staff of your hospital. First as knows what a gift god has given to us by giving eyes. Your Doctor Specially Dr. Patil is so excellent. I was first very scared but due to the skill and care given by Dr. Patil i am very happy. Umesh, Avinash team is very excellent and caring. Your reception staff is very polite and caring. All the best for good services. Thanks...

Pushpa Jayapalan

चष्म्याच्या दुकानात नंबर काढताना त्यांना डोळ्यात थोडासा दृष्टीदोष आढळला. त्यांनी पलूस मधील अनुराधा आय केअर केंद्रात तपासणी करण्यास सांगितले तेथे डॉक्टर व अटेंडंट दिलेल्या माहिती व सौजन्यपूर्ण वागणुकीमधून मला या आय हॉस्पिटल मध्ये डोळ्यांचे मोतीबिंदू ऑपरेशन करण्याचे जरूर वाटू लागले. डोळा हा अतिमहत्वाचा अवयव आहे. याची जाणीव असल्याने व येथील कर्मचारी वर्गाने दिलेल्या वागणुकीवरून मी येथे ऑपरेशन करून घेतले.

वि.भ.पवार - रा.पलूस

अनुराधा हॉस्पिटल मध्ये माझ्या दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन केले तिथला स्टाफ पण खूप चांगला आहे सेवा देखील चांगली देतात. ऑपरेशन आधी मला काही देखील दिसत नव्हते आता मी पेपर व इतर काहीहि वाचू शकतो. मला किल्लेदार डॉक्टर यांनी खूप काही चांगले दिले आहे. माझे तर असे म्हणणे आहे की सर्व पेशंट नी अनुराधा आय हॉस्पिटल मध्ये ऑपरेशन करून घ्यावीत मी सरांचा ऋणी आहे. धन्यवाद.............

श्रीपती शंकर वासुदेव

Oh! Anuradha Eye Netr Rugnalay Dr. Milind Killedar first I thank all the staff members serving in the Hospital services very honestly, promptly and very carefully. No time is wasted for patients. althought i am staying in Kolhapur I and my wife got opreted for cataract in this Hospital. very good treatment at reception, Indoor and very good counselling also. Good Management, cleanliness and the lunch for patients and beares. I realy appriciate, I have no word for appriciation. I Wish such services should be given in future for the patients. "Wish you all the Best" henceforth....

Dr. Sarjerao P Patil - M.Sc (Agri), Ph.D., D.FBM

माझे उजव्या डोळ्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन दि.१७/१२/२०१७ रोजी झाले. आज रोजी मी परत चेकिंग साठी आलो आहे. ऑपरेशन पासून आज पर्यंत आपल्या हॉस्पिटल मधील मा.डॉक्टर साहेब त्यानंतर असि.स्टाफ डॉक्टर आणि टेक्निशियन यांचे कडून फारच उत्तम वागणूक आणि ट्रीटमेन्ट मिळाले.त्याचबरोबर सर्व हॉस्पिटलच्या स्टाफ कडून चांगली वागणूक मिळाली. आपल्या हॉस्पिटलची पुढील कालावधीत भरभराट होवो हीच प्रार्थना. हॉस्पिटल मध्ये अध्यावत मशनरी आहेत हे पाहून उपचारासाठी कोणाच्याही मनात शंका येणार नाही. आपणास खूप खूप शुभेच्छा.. धन्यवाद.....

कल्लाप्पा लिंगू माळी

डॉक्टर चांगले आहेत. सर्व स्टाफ पेशंटशी आपुलकीने वागतो. ऑपरेशन नंतरची सेवा खूप चांगली आहे. डॉक्टर स्वतः येवून पेशंटची चौकशी करतात. स्वच्छता चांगली आहे. गरीब व गरजू पेशंट ना मदत करतात. अशिक्षित पेशंट ना समजावून सांगितले जाते. ऑपरेशन खर्च माफक दरात आहे. ऑपरेशन च्या पेशंट ना दिले जाणारे जेवण चांगले आहे. आमच्या पेशंट च्या दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन येथेच केले आहे. आम्ही समाधानी आहोत. सौ. भाग्यश्री बाबासाहेब पाटील - सांगली धन्यवाद....

श्रीमती.विमल पाराज

माझ्या आईचे डोळ्यांचे ऑपरेशन वेवस्थितपणे झाले व आता त्यांना काही त्रास नाही. आम्हाला या हॉस्पिटल बद्दल अभिमान आहे व आम्ही डॉक्टर साहेबांचे आभारी आहोत.

आनंदराव माने

अनुराधा नेत्र रुग्णालयाचा स्टाफ हा उत्तम असून येणाऱ्या सर्व रुग्णांची आस्तेवाईकपणे चौकशी, औषधोपचार इत्यादी सर्व प्रकारची योग्य काळजी, सल्ला, मार्गदर्शन करत असतो. त्यांचा वर्तनामध्ये आपुलकी व सेवाभाव दिसून येतो. सर्व स्तरातील रुग्णाबरोबर सलोख्याचे संबंध निर्माण करतो. ऑपरेशनच्या वेळी रुग्णांना धीर देणे तसेच त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचा नेहमी प्रयत्न करतो त्याचा धीर वाढवतो. ऑपरेशन नंतरच्या तपासण्या, औषधोपचार प्रामाणिक व आस्थेने करतो. कोणत्याही प्रकारची कुचराई करत नाही. या दवाखान्यात वृधासाठी लिफ्टची सुविधा सुचवावीशी वाटते. बाकी सर्व वेवस्था, वागणूक उत्तम प्रकारची मिळते. धन्यवाद.....

लक्ष्मण आण्णाप्पा माळी

माझ्या आईचे डोळ्यांचे ऑपरेशन करण्यापूर्वी तिला काही सुद्धा दिसत नव्हते. ऑपरेशन केलेनंतर उजव्या डोळ्याने तिला वेवस्थित दिसू लागले आहे. डोळ्यांचे ऑपरेशन म्हणजे तारेवरची कसरत असलेने ऑपरेशन चांगले झाले त्याचबरोबर दवाखान्यात चांगली सोय आहे. वेवस्थापन चांगले आहे.देखरेख चांगली करतात. तरी येथील कर्मचार्याचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे. धन्यवाद.

सोनाबाई धोंडीराम पाटोळे

मी सौ. शकुंतला आकाराम भंडारे, माझ्या डाव्या डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन दि११/०१/२०१८ ला झाले. एक महिन्यानंतर डोळ्याची तपासणी केली असता ऑपरेशन चांगले झाले आहे. जवळचे पाहण्यासाठी नंबरचा चेष्मा दिला. सेवक वर्ग चांगला वाटला. डॉक्टरांची पेशंट सोबत बोलण्याची पद्धत चांगली वाटली. दवाखान्यातील स्वच्छता बरी वाटली. आ.विश्वासू सौ. शकुंतला आकाराम भंडारे

सौ.शकुंतला आकाराम भंडारे

माझे ऑपरेशन चांगले झाले आहे. मी सर्व ठिकाणी चौकशी करून डॉ किल्लेदार साहेबांकडे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. माझे ऑपरेशन छान झाले. इथला सर्व स्टाफ अगदी चांगला वाटला. मी सर्व स्टाफ व डॉक्टर साहेबांचे आभार मानतो.

अनिल जाधव

मी पुष्पा टिकेकर रा उगार खुर्द, या हॉस्पिटल मध्ये मुद्दाम आले कारण येथे डोळ्यांची चिकित्सा उत्तम रीतीने होते व डॉ किल्लेदार सर अतिशय अचूक निदान करतात असे ऐकले होते. त्याप्रमाणे प्रत्येक्ष अनुभव ही आला. माझ्या दोन्ही डोळ्यांची ऑपरेशन उत्तम रीतीने झाली. त्यावेळी रिसेप्शन पासून सर्व कर्मचारी, डॉक्टर्स यांची वागणूक अतिशय घरगुती स्वरुपाची असल्याने खूप धीर आला. हॉस्पिटलची स्वच्छता व एकूणच काम करण्याची पद्धत मनाला भावली. मी डॉ.किल्लेदार सर व सर्वांची ऋणी आहे. धन्यवाद !

पुष्पा टिकेकर

माझे नाव भागीरथी भीमराव पाटील रा मु.पो. इनाम धामणी ता.मिरज जि.सांगली असून माझ्या दोन्ही डोळ्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन हे अनुराधा नेत्रालय मध्ये झाले आहे. हे ऑपरेशन वेवस्थित व सुरक्षित झाले आहे. हॉस्पिटल मधील स्टाफ याचे अत्यंत चांगल्या पद्धतीने सहकार्य लाभले. मी आता दोन्ही डोळ्यांनी स्पष्ठ बघू शकते.

भागीरथी भीमराव पाटील

अनुराधा नेत्र रुग्णालय या ठिकाणी माझ्या डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले. या हॉस्पिटल मधील सर्व सेवा अतिशय उत्कृष्ठ आहेत. निदान करण्याची पद्धत अतिशय निर्दोष आहे. दवाखान्यातील स्वच्छता खूप छान आहे व येथील डॉक्टर्स पासून ते सेवक वर्गापर्यंत सर्वांची सहकार्य करण्याची वृत्ती आहे.रुग्णांना दिली जाणारी वागणूक अतिशय चागली आहे. त्याबद्दल धन्यवाद....!

श्री.चंद्रकांत महादेव जत्राटे

अनुराधा नेत्र रुग्णालय या हॉस्पिटल विषयी सांगायचे म्हंटले तर मी म्हणेन की, मी या हॉस्पिटल मध्ये खूप वर्ष्या पासून किरकोळ डोळ्याचे दुकाने घेवून येत होते. आता वयोमानानुसार माझे गेल्या वर्षी व परत आता महिन्यापूर्वी मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले. ऑपरेशन अगदी छान झाले. माझी नजर मला परत मिळाली याबद्दल मी डॉक्टरांचे आभार मानते.त्याबरोबर येथील स्टाफ चे आभार मानते.ते व्येवस्थित पणे सर्व गोष्टी हाताळतात. ते कोणाशीही फटकून वागत नाहीत. हा माझा खूप वेळचा अनुभव आहे. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. धन्यवाद !!!!

पमुताई भोसले

I Dr. Anita Ulhas Kurane was surfing from B/L cataract before coming this hospital I went the most named hospital but I was confused the I heard about Anuradha Eye Hospital which is also the most named Hospital. When I came here I came to know about the lens used that is mono focal & Multi focal and was explained very nicely which I was very much satisfied with it. In this hospital patients go with a good feeling and satisfaction. All the staff members are helpful and guide the patents properly. I am very glad and thankful to come here. I thank Dr. Killedar for his valuable time and guidance to choose the lens.

Dr. Anita Ulhas Kurane

माझ्या डाव्या डोळ्याला गेली सहा महिने धुरकट दिसत होते म्हणून डोळे तपासले पण असे लक्षात आले कि, माझ्या दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदूची सुरुवात आली आहे आणि डाव्या डोळ्याला मोतीबिंदू जास्त आहे व त्याचे ऑपरेशन करायला पाहिजे असे मला इस्लामपूरच्या डॉक्टरनी सांगितले. पण मला दुसर्या डॉक्टरना दाखवून नक्की मोतीबिंदूच आहे कि नाही याची शंका दूर करायची होती म्हणून मी सांगली मध्ये अनुराधा नेत्र रुग्णालयाचे डॉ. किल्लेदार यांना दाखवून मगच ऑपरेशन चा निर्णय घेतला. डॉक्टरनी मला समजावून सांगितल्या नंतर माझी खार्ती पटली व मी इथे ऑपरेशन करून घेणेस तयार झाले.

ऑपरेशन च्या दिवशी सर्व माहिती देवून पेशंटची भीती कमी केली जाते हि पद्धत मला फार आवडली. ऑपरेशन नंतर देखील पाच दिवस व एक महिन्या पर्यंत कोणती काळजी घ्यावयाची याची सविस्तर माहिती मिळाली. त्या नंतर पाच दिवसाची तपासणी देखील फार वेळ न घेता लगेच झाली. आज एक महिन्याची तपासणी करून डॉक्टर नी मला चष्म्याचा नंबर लिहून दिला आहे.

एकूण सर्व ऑपरेशन चा प्रवास चांगला व समाधान कारक वाटला हॉस्पिटल स्टाफ देखील खूप को ऑपरेटीव्ह आहे. हॉस्पिटल ची अशीच उत्तोरोतर प्रगती व प्रसिधी होवो हि इच्छा.... धन्यवाद!

सौ. सुनिता कुबेर पाटील रा. सांगली

दि. १७ जानेवारी २०१७ रोजी माझ्या मुलीच्या डोळ्याचे तिरळेपणाचे ऑपरेशन झाले. ते अनुराधा नेत्र रुग्णालयात झाले. मुलीवर अत्यंत यशस्वीरित्या सर्जरी झाली. तिचे डोळे एकदम क्लिअर झाले. डॉ.मिलिंद किल्लेदार यांनीअत्यंत यशस्वीरित्या ऑपरेशन पारपाडले. डॉक्टर व त्यांच्या सर्व स्टाफला हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

विनिषा विक्रम पाटील रा. सांगली

माझ्या आईचा एका डोळ्यास रेटीना प्रोब्लेम मुळे दिसण्यास बंद झाले आहे. त्यामुळेआम्हाला दुसर्या डोळ्याची जास्त काळजी होती. परंतु माझ्या अनेक मित्रांनी डॉ. किल्लेदार यांचे नाव सुचविल्याने आम्ही डॉ. किल्लेदारयांची तपासणीची वेळ मागून घेतली व डॉक्टरांनी व्येवस्थित तपसणी करून मी स्वतः ऑपरेशन करेनअसे सांगितले. द्वाखानेत आले नंतर त्या त्या वेळी नेमून दिलेल्या वेळेत सर्व तपसण्या झाल्या. खरोखरच इथला सर्व स्टाफ खूप हेल्पफुल नेचारचा आहे. प्रत्येकाचेपेशंटशीबोलणेही आपलेपणाचे आहे.

माझे आईचे ऑपरेशन अत्यंत उत्तमपणे झालेले आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार.

लता रामचंद्र कदम रा. सांगली

माझ्या उजव्या डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशनदि.०३/०१/२०१५ रोजी झाले व डाव्या डोळ्याचेऑपरेशन ०९/०२/२०१७ रोजी झाले. मला मल्टीफोकल लेन्स बसविल्या आहेत. ऑपरेशन पूर्वी माझी नजर कमजोर झाली होती. ऑपरेशन नंतर मला अत्यंत व्येवस्थित चष्म्याशिवाय दिसते. ड्रायविंग व्येवस्थित करता येते.

माझ्या डोळ्याचे ऑपरेशन अत्यंत सुंदर व व्येवस्थित झाले आहे. हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ ने अत्यंत प्रेमळ व चांगली वागणूक दिली आहे. येथील सोयी सुविधा खूप चांगल्या आहेत. मी डॉक्टर साहेबांचा व सर्व स्टाफ चा अत्यंत आभारी आहे.

रामचंद पाटील रा. सांगली

अनुराधा आय हॉस्पिटल मधील डॉक्टर व सर्व स्टाफ आवडला. हलगर्जीपणा कुठेही नव्हता हि गोष्ट आवडली. आमच्या सोलापूर मधील दवाखान्या पेक्ष्या हा दवाखाना आवडला. माझ्या आई वडिलांचे ऑपरेशन देखील इथेच झाले. त्यांची हि सध्या काही तक्रार नाही. माझही कोणतीच तक्रार नाही. या हॉस्पिटल मध्ये पेशंट कडे दुर्लक्ष नसते. आमच्या तक्रारी अडचणी समजून घेतल्या जातात व प्रत्येक गोष्ट समजावून सांगितल्या जातात. ऑपरेशन च्या फाईल मध्ये पण सगळ्या गोष्टी व्येवस्थित समजतील अशा भाषेत आहेत.

हा दवाखाना चांगला असलेने आम्ही सोलापूरहून इकडे आलो. तपासनीसही जास्त वेळ लागला नाही. एकंदरीत डॉक्टर, सर्व स्टाफ चांगला असलेने माझे ऑपरेशन इथे करण्याचा निर्णय घेतला. इथून पुढे सुद्धा डोळ्याच्या बाबतीत काही तक्रार असेल तर मी इथेच येउन दाखवेन.

राजेंद्र उमदाळे रा.सोलापूर

आपल्या हॉस्पिटल मध्ये आमचे वडील श्री. राजगोंडा बाबगोंडा पाटील यांचे दि. ०४/०३/२०१७ रोजी मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले. ऑपरेशन पूर्वी आम्हाला कौन्सिलर यांनी ऑपरेशन, लेन्सच्या किमती व प्रकार आणि त्याचे त्याचे उपयोग यासंबंधी अतिशय उत्कृष्टपणे माहिती दिली व खूप सहयोग दिला. डॉ. मिलिंद किल्लेदार सर यांनी स्वतःऑपरेशन अतिशय निष्णात पद्धतीने केले आणि ऑपरेशन नंतर घ्यावयाची काळजी ई. ची संपूर्ण कल्पना दिली.

हॉस्पिटल मधील डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, कौन्सिलर व रिसेप्शन विभाग यांनी अतिशय उत्तम प्रकारे सहकार्य केले त्या बद्दल धन्यवाद. आम्ही सर्व कुटुंबीय आपले सहर्ष आभारी आहोत.

राजगोंडा बाबगोंडा पाटील रा. सांगली

मी निमशासकीय संस्थेमध्ये सर्विस करीत होतो. सन १९९३-९४ मध्ये मला मधुमेहाचा त्रास सुरु झाला वर्षभरामध्ये दोन्ही डोळ्यांना वेगळेपणाचा त्रास सुरु झाला. त्यावेळी मी नेत्र रुग्णालय समंधी उपचार कोणाकडे करावे अशी चौकशी केली त्यावेळी बहुसंख्य लोकांनी डॉ.किल्लेदार सरांचे नाव आवर्जून सांगितले.

मी डॉ. किल्लेदार यांचा दवाखाना पहिला तो भव्य दिव्य पाहून मला हे डॉक्टर निश्चित माझ्याडोळ्यांचा त्रास कमी करतील असे वाटले. त्यांनी तपासणी केली आणि दोन्ही डोळ्यांचे लेझर उपचार करणेबाबत सांगितले.त्याप्रमाणेत्याची फी भरून त्रास कमी करून घेतला. चष्मा दिला तो वापरणेस चालू ठेवले. पुढे २०१५ पर्यंत डोळ्यांची स्थिती सुखरूप होती. नंतर २०१५ ला उजव्या डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन करून लेन्स बसविली. आता फेब्रु २०१७ मध्ये डाव्या डोळ्याचे मोतीबिंदू ऑपरेशन करून लेन्स बसविली आहे.

एकंदरीत पहिले तर जवळ जवळ डोळ्यांचा उपचार करून २३ वर्षे मी सुखा समाधानाने जीवनआनंदाने घालवीत आहे. डॉक्टरांच्या उपचाराने व आशीर्वादानेहे सर्व घडले असे मी मानतो. त्यांच्या रुग्णालयातील संपूर्ण स्टाफ उत्तम आहे व त्यांची वागणूक आपलेपणाची आहे. तसेच उपचार फी सुद्धा माफक आहे. त्यांचे हातून हि समाज सेवा चांगली चालू आहे. परमेश्वर त्यांना अशी सेवा करणेस उदंड आयुष्य देवो हि सदिच्छा.

महादेव दत्तात्रय गुरव रा. सांगली

मी गेली ५-६ वर्षे नियमित डोळ्यांची तपासणी करीत होतो. हॉस्पिटल मधील सर्व व्यवस्था, स्वच्छता उत्तम आहे. सर्व स्टाफ यांची हि उत्तम सहकार्य असते. दि.२४/०१/२०१७ रोजी माझे मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले आहे. ऑपरेशन अत्यंत चांगल्या प्रकारे झाले. त्यामुळेसदर अनुराधा नेत्रालयाबद्दल आपुलकी वाटते. नेत्रलयाचा नावलौकिकदिवसेंदिवस वाढत जावो हि परमेश्वर चरणी प्रार्थना....................धन्यवाद !

प्रा. डॉ. डी. टी. पाटील रा. सांगली

माझ्या उजव्या डोळ्याचे ऑपरेशन डॉ.मिलिंद’ किल्लेदार यांनी केले. ऑपरेशन चांगल्या पद्धतीने झाले. डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यापूर्वी ऑपरेशन बद्दलची योग्यप्रकारे माहिती देवून माझी भीती घालीवली.

येथील संपूर्ण स्टाफ चे चांगले सहकार्य मिळाले. मला आता सांगण्यात आनंद होतो कि, मला आता उजव्या डोळ्याने चांगले दिसत आहे. तसेच मी डॉ.किल्लेदार व त्यांच्या सर्व टीम ला मनपूर्वक शुभेच्छा देत आहे. ....................धन्यवाद !

सौ.धोंडूबाई पांडुरंग सुतार रा. डोंगरसोनी

अनुराधा नेत्र रुग्णालयात माझ्यादोन्ही डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले मला आता खूपच स्पष्ट दिसत आहे व आता कोणतीही तक्रार राहिली नाही. मला या रुग्णालयात चांगली सेवा मिळाली. डॉक्टर वइतरस्टाफ कडून आपुलकीच्या भावनेने चौकशी केली जाते व योग्य उपचार व नम्र भाव होते त्यामुळे मला दवाखान्या संबंधी व डॉक्टरच्याबद्दल आदर वाटतो. नमस्कार...........!

धोंडीराम ज्ञानदेव कोडग रा.सांगली

आपल्या हॉस्पिटल मधील सेवा अतिउत्तम आहे. अगदी चौकशी पासून ते ऑपरेशन होवून बाहेर पडेपर्यंत.... स्टाफ कडून, डॉक्टराकडून हि खूपच आपुलकीची सेवा मिळाली. बऱ्याच लोकांनी ऑपरेशन कुठे झाले ? असे विचारले असता आपल्या हॉस्पिटल चे नाव सुचविले जाते. अशीच उत्तम सेवा यापुढे हि चिरंतन राहो हीच सदिच्छा................धन्यवाद!

श्री चंद्रकांत शिवलिंग महिमकर रा. करोली

I Have Been Operated in Anuradha Eye Hospital & Polyclinic on 17/01/2017. The Skill, Service and friendly behaviour of Doctor’s, Technicians and staff is really marvellous. I am Fully Satisfied and soon waiting for another Operation. Many Good wishes for prosperous services of your hospital

Mr. Ashok R Joshi, Sangli

माझे नाव प्रणव पाटील आहे. माझे B.Tech.शिक्षण वालचंद कॉलेज मधून झाले असून मी I.T. पदवीधर आहे तसेच I.T. क्षेत्रात असल्यामुळे माझे जास्त काम हे कॉम्पुटर व मोबाईलवर असते. मला लहानपणापासूनच चष्मा होता व चष्म्याचा नंबर हि खूप जास्त होता व आता तो वाढत वाढत तो आता ६.२५ व ४.२५ होता तसेच मी I.T.प्रोफेशनल असल्यामुळे चष्म्याचा खूप त्रास होत होता. मला पोहण्याची हि खूप आवड आहे पण चष्मा बाहेर काढून ठेवला कि मला काही दिसत नव्हते, माझे मित्र कुठे आहेत वगैरे व याचाही मला खूप त्रास व्हायचा.तसेच मला खगोलशास्त्राची हि खूप आवड आहे व ग्रह- तारे पाहताना हि चष्मा काढून ठेवावा लागत होता व त्याचा खूप त्रास व्हायचा. मग आम्हाला लासिक सर्जरी बद्दल समजले. डॉक्टरांचे नाव पेपरात/जाहिरातीत पाहिले लासिक सर्जरी करतात म्हणून व एक दिवशी भेटायला आलो. डोळ्याचे ऑपरेशन म्हणल्यावर थोडी भीती वाटतेच म्हणून आमच्या शंका दूर कराव्यात यासाठी तीन – चार वेळा भेटायला आलो अशीनव त्याप्रमाणे डॉक्टरानिआमच्या सर्व शंका दूर केल्या व हे ऑपरेशन हे खूप सुरक्षित असते व डोळ्याला कसल्याही प्रकारचा धोका नसतो. त्यानंतर योग्यत्या सर्व तपसण्या करण्यात आल्या व तुमचा डोळा लासिक सर्जरी करण्यासाठी फिट आहे कि नाही हे तपासले व सर्व रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्या नंतर तुम्ही सर्जरी करू शकता. नंतर एक तारीख फिक्स करून लासिक ऑपरेशन करून घेतले. ऑपरेशन दिवसी हि थोडे नर्वस्नेस व भीती होती कारण डोळ्याचे ऑपरेशन आहे म्हणून. तसेच ऑपरेशन च्या प्रत्येक स्टेप्सला जे काय होणार आहे ते डॉक्टर मला सांगत होते. व माझे ऑपरेशन १० ते १५ मिनिटामध्ये एकदम रिल्याक्स मध्ये झाले. व दुसर्या दिवशी मी चेकअप ला आलो व दुसर्या दिवसापासूनच मला एकदम क्लीअर दिसायला लागले व मला आता कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. धन्यवाद...!

प्रणव पाटील

माझे नाव अविनाश कुलकर्णी वय वर्ष ७५. मी एक दिवस सिव्हील हॉस्पिटल मध्ये काम करीत बसलो होतो व काम करते वेळी मला अस्पष्ट दिसायला लागले.त्यानंतर मी माझ्या एका डॉक्टर मित्रा कडे डोळे तपासून घेतले व त्यांनी सांगितले कि लवकरात लवकर नोतीबिंदूचे ऑपरेशन करून घेणे गरजेचे आहे. ऑपरेशन म्हणल्यावर थोडे दडपण आले कारण वय ७५ आणि त्यात ऑपरेशन व ते सक्सेस झाले तर ठीक नाहीतर डोळे गेले आपले. जेव्हा मी यातून स्थिर झालो तेव्हा ऑपरेशन कोणाकडे करायचे हा विचार करीत होतो व लगेचच अरविंद किल्लेदार हे नाव आठविले कारण ते माझे २२ वर्षे सहकारी होते व त्यांचा मुलगाच डॉक्टर आहे म्हणल्यावर मला दुसरीकडे कुठे पहायची गरज भासली नाही. मी जेव्हा हॉस्पिटल मध्ये आलो व नोंदणी हि सर्व प्रोसेस झाले नंतर डॉक्टरानी तत्वता सर्व तपसण्या करून झाले नंतर लवकरात लवकर ऑपरेशन करू घेणे गरजेचे आहे असे सांगितले व ऑपरेशनला येणे पूर्वी योग्य त्या तपसण्या करण्यास सांगितल्या. त्याप्रमाणे मी ऑपरेशन दिवशी हॉस्पिटल मध्ये आलो मला स्पेशल रूम दिली गेली त्यांनतर ऑपरेशन थियटर मध्ये नेनेपुर्वी ज्या काही प्रोसेस आहेत त्या सिस्टर नी करून घेतल्या व आत ऑपरेशन थियटर मध्ये गेलेनंतर काही मिनिटातच ऑपरेशन केले व डॉक्टरानी ऑपरेशन व्येवस्तीत झाले व मला काही जाणीवले हि नाही.त्यानंतर कसलाही त्रास नाही कि भीती नाही स्वतः डॉक्टरांनी ऑपरेशन व्येवस्तीत झाले आहे असे सांगितले. व त्यानंतर मला धीर आला व मनाला आंनद झाला कि मी आता व्येवस्तीत पाहू शकतो, वाचू शकतो. त्यानंतर संध्याकाळी मला डीश्चार्जमिळाला मी घरी गेलो त्यानंतर मला कसलाही त्रास झाला नाही. डॉक्टरांनी योग्य ती काळजी घ्यायला सांगितली होती ती मी त्याप्रमाणे घेतली. त्यानंतर डॉक्टरांनी दुसऱ्या हि डोळ्याचे ऑपरेशन करून घेण्यास सांगितले होते व ते हि करून घेतले व आता मला अतिशय चांगल्या प्रकारे दिसते, लिहिता, वाचता येते. मला या हॉस्पिटल मध्ये अतिशय उत्कृष्ट अशी ट्रीटमेंट मिळाली व माझी योग्य ती काळजी घेण्यात आली अगदी घरच्या मेंबर सारखी काळजी येथे घेतली जाते मी येथे अनुभवले आला आहे.माझ्या प्रमाणेच येथे प्रत्येक पेशंटची काळजी घेतली जाते असे माझे आता मत झाले आहे. त्यानंतर माझ्या मिसेसच्या दोन्ही डोळ्याची हि येथेच ऑपरेशन करून घेतली. व इतरानाही येथेच ऑपरेशन करून घेण्याचा सल्ला दिला. मी माझ्या सहकारी मित्राला धन्यवाद देतो व सर्वांचे मनापसून आभार मानतो....धन्यवाद!

अविनाश कुलकर्णी

माझे नाव छाया थोरात आहे व मी प्राथमिक शिक्षिका आहे तसेच २ वर्षापूर्वी मी येथे डोळे तपासणीसाठी आले होते त्याप्रमाणे मी डोळे तपासून घेतले व डॉक्टरांनी नंबर काढून दिला व दर वर्षांनी एकदा डोळे तपासून घ्या असा सल्ला दिला. म्हणून त्याप्रमाणे मी डिसेंबर मध्ये डोळे तपसणी साठी आले होते तेव्हा डॉक्टरांनी तुम्हाला उजव्या डोळ्याला मोतीबिंदू आहे व तुमच्या वेळेप्रमाणे ६ महिन्यामध्ये ऑपरेशन करून घ्या असे सांगितले. त्याप्रमाणे मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ऑपरेशन करून घ्यायचे ठरिवले. त्यामध्ये लेन्स कोणती बसवावी व त्याची पॉवर याची हि माहिती देण्यात आली त्यामध्ये अगदी १०००० पासून ते ५५००० पर्यंत लेन्स बसविली जाईल याची माहिती देण्यात आली. मग या सर्वांचा विचार करिता माझे वाचन लिखाण व नोकरी च्या दृष्टीकोनातून मी मल्टिफोकल लेन्स बसविण्याचे ठरिवले कारण या लेन्स मुळे मला लिहायला, वाचायला, जवळचे, मधले व लांबचे सर्व काही दिसण्यास मदत होईल व त्याबरोबर तुम्हाला चष्मा वापरावा लागणार नाही असे सांगण्यात आले.व त्याप्रमाणे मी ती लेन्स बसविण्याचे ठरविले. ऑपरेशन दिवशी जेव्हा येथे आलो तेव्हा ऑपरेशन ची सर्व माहिती देण्यात आली, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याचा विश्वास देण्यात आला व ऑपरेशन जी भिती मनात असते ती काढण्यात आली. ऑपरेशन थियटर मध्ये गेले नंतर अगदी ५ ते ७ मिनिटामध्ये डॉक्टर माझ्याशी बोलततच होते त्यामुळे ऑपरेशन कधी झाले हे कळालेच नाही. ऑपरेशन नंतर कोणती काळजी घ्यावी याचीही वेवस्थित माहिती सांगण्यात आली. मी मल्टिफोकल लेन्स बसविले मुळे मला आता लिहायला, वाचायला चांगल्याप्रकारे दिसतंय व चष्मा हि वापरावा लागत नाही. त्यामुळे दुसर्या हि डोळ्याचे लगेचच ऑपरेशन करून घ्यायचे ठरिवले व पुढील १५ दिवसांनी ऑपरेशन करून घेतले. इथला सर्व स्टाफ खूप चांगला आहे तसेच येथे जेवणाची सोय हि खूप चांगली आहे. मला इथले सर्वात जास्त आवडले ते म्हणजे इथली स्वच्छता. इथले स्टाफ मेम्बर्स खूप सहकार्य करताच त्याचबरोबर डॉक्टरांची सेवा खूप उत्कृष्ट आहे. माझे दोन्ही डोळ्याचे ऑपरेशन इथे झाले मला आता खूप बरे वाटते व सर्व काही स्पष्ट दिसते. मी मनापासून सर्वाना धन्यवाद देते.... धन्यवाद!

छाया थोरात